IMG-LOGO
क्रीडा

IND vs USA : टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारतासमोर अमेरिका भिडणार

Wednesday, Jun 12
IMG

टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध अमेरिका आमने सामने येणार आहेत.

न्यूयॉर्क, दि. १२ :  नसाऊ कौंटी मैदान हे फलंदाजांसाठी अनुकूल नसल्याचे गेल्या काही सामन्यांतून समोर आले आहे. यजमान अमेरिकेने सर्वांच्या अपेक्षांच्या विपरीत कामगिरी केली असून त्यांनी पहिल्या लढतीत पाकिस्तानला नमवत लक्ष वेधले. अमेरिकेच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. यामध्ये सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग यांचाही समावेश आहे. या दोघांनीही संघाकडून चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने या सामन्यात विजय नोंदवल्यास त्यांचे तीन सामन्यांत आठ गुण होतील. त्यानंतर त्यांचे ‘सुपर एट’ फेरीतील स्थानही निश्चित होईल.टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध अमेरिका आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने खेळले असून सर्व सामने जिंकण्यात या टीम्सना यश आलं आहे. अमेरिकेच्या संघात मूळचे भारतीय असलेले आठ खेळाडू आहेत. यासह पाकिस्तानातील मूळचे दोन, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा प्रत्येकी एक खेळाडू त्यांच्या संघात आहे. संघात मोनांक पटेल, हरमीत, नेत्रावळकर, जेसी सिंग व नोशतुश केंजीगे यांचा भारताच्या फलंदाजांसमोर त्यांचा चांगला कस लागेल. सौरभ नेत्रावळकर आज भारतीय टीमसमोर खेळताना दिसणार आहे. त्याला या सामन्यात प्रवेश करणं सोपं जाणार नाही. याचं कारण म्हणजे त्याने भारताकडून अंडर 19 क्रिकेट खेळलं आहे. टीम इंडियातील सध्याच्या अनेक खेळाडूंसोबत तो देशांतर्गत क्रिकेटही खेळला आहे. बुधवारी भारत आणि अमेरिका यांच्यात सामना होणार आहे. T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) चा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.भारतीय संघ : रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Share: