IMG-LOGO
क्रीडा

IND vs BAN T20I : भारताने बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा

Monday, Oct 07
IMG

सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार खेळ करत ७ गडी राखून विजय मिळवला.

ग्वाल्हेर, दि. ७ : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना रविवारी (६ ऑक्टोबर) ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार खेळ करत ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेश संघाला १२८ धावांचेच लक्ष्य देता आले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या ११.५ षटकांत म्हणजेच केवळ ७१ चेंडूत ३ गडी गमावून सामना जिंकला. भारतीय संघाकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत २९ धावा केल्या. तर संजू सॅमसन याने १९ चेंडूत २९ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १६ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या तर नितीश कुमार रेड्डी याने पदार्पण सामना खेळताना १५ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. वरुण चक्रवर्ती २०२१ नंतर भारतीय टी-20 संघात परतला. परतल्यावर पहिल्या सामन्यात त्याने ४ षटकात ३१ धावा देत ३ बळी घेतले. त्याने ताहिद हृदय (१२ धावा), झाकेर अली यांना फक्त ८ धावा काढू दिल्या आणि तिसरी विकेट म्हणून त्याने ११ धावांवर रिशाद हुसेनला हार्दिक पांड्याकडे झेलबाद केले. 

Share: