योगमुळे जीवनात सकारात्मकता येते... असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
जम्मू-काश्मीर, दि. २१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनानिमित्त जम्मू-काश्मीर याठिकाणी असल्यामुळे श्रीनगरमध्ये प्रत्येक नाक्यावर, गल्लीबोळात पोलिसांचा कडेकोट पहारा आहे. श्रीनगरमधील दल सरोवर येथे यंदाच्या योग दिनाच्या कार्यक्रमात मनोरम्य वातावरणाची अनुभूती येत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. यंदाच्या वर्षाच्या योग दिनची थीम महिला सक्षमीकरणासाठी आहे. आजच्या दिवसांमध्ये योगा करण्याचे फायदे देखील मोदी यांनी सांगितले. श्रीनगरमधून पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधीत देखी केलं आहे. योग करा आणि निरोगी रहा... असं मोदी म्हणाले. योग समाजात सकारात्मक बदलाचे नवीन मार्ग तयार करत आहे. योगसाधनेवर वेगवेगळी संशोधन सुरु आहेत... असं देखील मोदी म्हणाले. जम्मू - काश्मीर योदसाधनेची भूमी आहे. योगमुळे जीवनात सकारात्मकता येते... असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.