हादरवणाऱ्या घटनेनंतर कोलकाता येथील रुग्णालयात डॉक्टरांचे आंदोलन सुरु आहे.
कोलकाता, दि. १७ : येथील डॉक्टरांच्या आंदोलनामधून तोडगा काढण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानी बोलवलं होतं. कालीघाट या ठिकाणी ममता बॅनर्जींचं निवासस्थान आहे. त्या ठिकाणी आंदोलनकर्ते डॉक्टर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत डॉक्टरांनी सरकारपुढे त्यांच्या मागण्या मांडल्या. तर ममता बॅनर्जींनी सगळ्या डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याची आणि कामावर परतण्याची विनंती केली.वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी ९ ऑगस्टला एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक खुणा होत्या, तसंच रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणावर झाला होता. संपूर्ण हादरवणाऱ्या घटनेनंतर कोलकाता येथील रुग्णालयात डॉक्टरांचे आंदोलन सुरु आहे.