IMG-LOGO
लोकसभा २०२४

राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ सोडला; प्रियांका गांधी काँग्रेसच्या उमेदवार

Tuesday, Jun 18
IMG

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी काँग्रेसच्या उमेदवार असतील.

दिल्ली, दि. १८ :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेची निवडणूक उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघामधून लढवली होती. या दोन्हीही मतदारसंघात राहुल गांधी यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. मात्र, आता काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून राजीनामा देणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधी आता उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून खासदार राहणार आहेत.राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी काँग्रेसच्या उमेदवार असतील. वायनाडसाठी प्रियांका यांचं नाव जाहीर होतात भाजपानं त्यावर टीका केलीय. काँग्रेसची प्रत्येक कृती ही तो कुटुंबानी कुटंबासाठी आणि कुटुंबाकडून चालवण्यात येणारा पक्ष असल्याचं सिद्ध होत आहे. राहुल यांनी ते दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत हे शेवटपर्यंत वायनाडच्या मतदारांपर्यंत लपवून ठेवलं, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल अँटोनी यांनी केली. 

Share: