IMG-LOGO
महाराष्ट्र

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

Friday, Aug 16
IMG

याप्रश्नी लोकसभेची संसदीय चिकित्सा समिती नेमा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

मुंबई, दि. १६ :  महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल? यावरून चर्चा सुरु आहेत. आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. “ महायुती सरकारला आता जाग आली आहे. आता ते पाण्यात डुबक्या मारून पवित्र होता येईल का? पाहत आहेत. मग ते सगळीकडे स्वत:चे फोटो छापत आहेत. मात्र, आपण ही निवडणूक अशी लढायची हे आपण ठरवायचं आहे. पण आपल्यामध्ये काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे चेहरा आहेत की आणखी कोण आहे? मी आता या ठिकाणी सांगतो, येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मुख्यमंत्रि‍पदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो”, अशी घोषणाच उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.‘मविआ’च्या निर्धार मेळाव्याचे षण्मुखानंद सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. ‘लोकसभेची लढाई संविधान वाचवण्याची होती, विधानसभेची लढाई महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र संस्कृती वाचवण्याची आहे. ‘मविआ’चे दूत म्हणून गावागावात जा आणि आपल्या कामाचा प्रचार करा. वज्रमूठ शब्दात नको, ती प्रत्यक्षात हवी. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण त्यांना झोपवू याची शपथ घ्या, असे आवाहन उद्धव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण नेऊन मराठ्यांना आरक्षण देण्यास आपला पाठिंबा आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपात २५ वर्षे भोगले ते आघाडीत होता कामा नये. ज्यांच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण नको. आघाडीत पाडापाडीचे राजकारण होता कामा नये. जागा कुणाच्याही वाट्यास येवो एकदिलाने प्रचार करा. लोकसभा निवडणुकीने दाखवलेली दिशा कायम ठेवण्यासाठी विधानसभेची निवडणूक जिंकावीच लागेल. या शब्दात उद्धव यांनी ‘मविआ’ नेत्यांना कानपिचक्या दिल्या. केंद्र सरकार टेकूवर असल्याने मोदी आता धर्मनिरपेक्ष शब्द वापरायला लागेलत, तुम्ही हिंदुत्व सोडले असे आम्ही म्हणू काय’, अशी विचारणा त्यांनी केली. बौद्ध आणि मुस्लीम मतदारांचा उद्धव यांनी विशेष उल्लेख केला. ‘वक्फ’बरोबरच धार्मिक जमिनी उद्याोगपतींना देण्यास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अयोध्येतील जमिनी व केदारेश्वराचे सोने कोणाच्या घशात गेले, याप्रश्नी लोकसभेची संसदीय चिकित्सा समिती नेमा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

Share: