IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Tuesday, Mar 26
IMG

शिवाजीरावांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आढळराव यांच्या प्रवेशानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच राहणार आहे.

मुंबई, दि. २६ : शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (दि. २६) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटीलदेखील उपस्थित होते. शिवाजीरावांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवाजीरावांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आढळराव यांच्या प्रवेशानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच राहणार आहे.

Share: