विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर गावात घडली आहे.
चंद्रपूर, दि. ११ : राज्यात गणेशोत्सवाची धामधूम असताना चंद्रपूर जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात काम करणाऱ्या चार शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लावून मृत्यू झाला आहे. वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर गावात घडली आहे. विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर २ जण गंभीर जखमी झाले. शेतामध्ये खत टाकण्यासाठी गेले असता चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. वन्यप्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान किंवा रानडुक्करच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात वीज पुरवठा सोडल्याच्या प्रकारातून ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.