भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन निवडणुकीतील जागावाटपाबाबत चर्चा केली.
मुंबई, दि. २० : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. निवडणुकीत पाच जागा आणि मंत्रिपदही मागितलं आहे. रामदास आठवले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन निवडणुकीतील जागावाटपाबाबत चर्चा केली. आपल्याला जास्त नको, फक्त पाच जागा हव्यात. सरकार स्थापन झाल्यावर आपल्या पक्षाच्या नेत्याला मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळायला हवं, असा त्यांचा आग्रह होता.