‘मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हा अपघात आहे.
कोल्हापूर, दि. २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला.या प्रकारामुळे राज्यभरातून महायुती सरकारवर जोरदार टीका सुरू आहे.दीपक केसरकर यांनी वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात घडला असेल असे वादग्रस्त वक्तव्य केले. ‘मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हा अपघात आहे… कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल. त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल….’ असं अजब विधान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतंच केलं होतं. केसरकर यांना त्यांच्या या अजब विधानामुळे सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात आहे.