IMG-LOGO
राष्ट्रीय

मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा; विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Thursday, Oct 03
IMG

अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेचा समावेश आहे.

नवी दिल्ली, दि. ३  :  मराठी जणांसाठी आनंदाची बातमी असून केंद सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. अनेक सरकारकडून याचा पाठपुरावा केला जात होता. अखेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे.मराठीसोबतच पाली,बंगाली,आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील ही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत आज (गुरुवार) चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गेल्या अनेक दशकांपासून मागणी होत होती. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी यासाठी प्रयत्न केले होते. आज अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेचा समावेश आहे.

Share: