शिवपुतळा परिसर सुशोभीकरण व इतर कामांसाठी सरकारने ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती.
मालवण, दि. २६ : मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे सांगितले जात आहे. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज (सोमवार) दुपारच्या सुमारास हा पुतळा कोसळला. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुतळा पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग समुद्रकिनारी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा असावा, अशी नौदलाची इच्छा होती, पण भारतीय पुरातत्व संस्थेचा याला आक्षेप होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किनाऱ्यावरील शिवपुतळा परिसर सुशोभीकरण व इतर कामांसाठी सरकारने ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुतळा उभारणीचे काम जलदगतीने पूर्ण केले होते.