IMG-LOGO
महाराष्ट्र

निवडणुकीत आशीर्वाद द्या, नाहीतर लाडकी बहिणीचे १५०० रुपये परत घेणार; रवी राणांचे वादग्रस्त वक्तव्य

Tuesday, Aug 13
IMG

लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार अजित पवारांसह महायुतीच्या नेत्यांकडून सुरु आहे.

अमरावती, दि. १३ :  आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करू. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, अशी धमकी वजा इशारा रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला.  ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं रवी राणा म्हणाले. लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार अजित पवारांसह महायुतीच्या नेत्यांकडून सुरु आहे. मात्र आता याच योजनेच्या नावाने आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अमरावती येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात आमदार रवी राणा बोलत होते. 

Share: