भविष्यवाणीनुसार जून महिन्यात पाऊस कमी पडेल. त्यानंतर जुलै महिन्यात साधारण पाऊस होणार आहे. ऑगस्टमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची बरसात होईल.
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. तापमान वाढल्यानं त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे. हवामान विभागानंच ही माहिती दिलीय. नैऋत्य मान्सून ३१ पर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मान्सून १९ मे रोजी अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर तो देशातील अन्य भागात पुढं सरकेल.भविष्यवाणीनुसार जून महिन्यात पाऊस कमी पडेल. त्यानंतर जुलै महिन्यात साधारण पाऊस होणार आहे. ऑगस्टमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची बरसात होईल. तर सप्टेंबर महिन्यात यंदा दमदार पाऊस असेल, असं भेंडवळचं भविष्य आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार देशात अल निनो सिस्टम कमकुवत होत आहे. तर ला नीना सक्रीय होत आहे. यंदा देशात चांगला पाऊस पडण्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे देशात यंदा नेहमीपेक्षा लवकर मान्सून दाखल होऊ शकतो.