संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले.
मुंबई, दि. १८ : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील काही पक्षांत बंडखोरी होत असून काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होत आहे. त्यातच मतदारयादी मध्ये हेरगिरी करून नावे परस्परपणे कमी केली जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीकरून करण्यात आला आहे. \महाविकास आघाडीकडून शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास महायुतीकडून महायुती सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले. जितेंद्र आव्हाडे म्हणाले की प्रत्येक मतदारसंघातून 5 हजार नावे कमी करण्याचा डाव महायुती सरकारकडून करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की फॉर्म नंबर सात हा ऑनलाईन भरण्याची पद्धत चुकीची आहे. प्रत्येक मतदारसंघातून 5 हजार नावे कमी करण्याचा डाव आहे. सिन्नरमध्ये अशीच पाच हजार नावे वगळण्यात आली. मात्र, आक्षेप घेतल्यानंतर परत आली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, मतदार यादी सुद्धा चुकीच्या पद्धतीने छापली गेली आहे. त्यामुळे निवडणूक पद्धत संशयास्पद ते म्हणाले. या सर्व प्रक्रियेमुळेच मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकाच घरातील पाच नावे वेगळ्या केंद्रावर असल्याचे त्यांनी सांगितले