IMG-LOGO
महाराष्ट्र

हीच ती मोदी गॅरंटी, हात लावीन तिथे माती होईल : उद्धव ठाकरे

Sunday, Sep 01
IMG

हुतात्मा चौकात पोलिसांचा विरोध झुगारून हे आंदोलन सुरू करण्यात आले.

मुंबई, दि. १ : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. आज महाविकास आघाडीतर्फे सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी मविआचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शिवरायांची मग्रूरीने माफी मागणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांना हकलवून लावा असे म्हणत पुतळा घाई घाईने उभारण्याची घाई का होती? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की मोदी गॅरंटी. हीच ती मोदी गॅरंटी, हात लावीन तिथे माती होईल”, असं म्हणत त्यांनी टीकाही केली.हुतात्मा चौकात पोलिसांचा विरोध झुगारून हे आंदोलन सुरू करण्यात आले. येथील स्मारकाचे दर्शन घेऊन आंदोलन ही गेट वे ऑफ इंडिया समोर जमले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार शाहू महाराज, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांच्यासह मविआचे मोठे नेते आंदोलनात सहभागी हेल होते. गेट वे ऑफ इंडिया समोर जमलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी पहिल्या काही वाक्यांमध्येच महाराजांची आणि सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली. या पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांची आणि शिवप्रेमीची माफी मागितली. त्यांनी माफी नसती मागितली तर महाराष्ट्रने त्यांना शिल्लक ठेवलं नसतं. त्यांनी मगरूरीने माफी मागितली. अशा महाराष्ट्र द्रोह्यांना आता गेट आऊट ऑफ इंडिया करा. त्यांनी केलेल्या चुकीला आता माफी नाही, असे ठाकरे म्हणाले.

Share: