IMG-LOGO
महाराष्ट्र

भोंदू बाबाकडून आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, अखेर कोर्टाने शिक्षा सुनावली

Sunday, Sep 01
IMG

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दुलेवाले बाबाविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.

नागपूर, दि. १ : नागपूरमधून २०२१ मध्ये घडलेल्या एका घटनेत भोंदू बाबाने भूतबाधेची भीती दाखवून काच घरातील चार महिलांवर बलात्कार केला होता. याप्रकरणी पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी.जयस्वाल यांनी नराधम भोंदूबाबाला दोषी ठरवून २० वर्षांचा कारावास ठोठावला आहे. धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (वय ५०, रा. अंबेनगर, भांडेवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. भोंदूबाबाने एका तरुणीच्या अंगात भूताचा वास असल्याचे सांगून २१ दिवस धार्मिक पूजा करावी लागेल, असे कुटूंबीयांना सांगितले. तसेच तरुणीमुळे अन्य महिलांनाही भूतबाधा झाल्याचे सांगत मुलीची आई, मुलगी, मामी आणि ६० वर्षीय आजीवरही त्याने बलात्कार केला. तंत्र-मंत्राने भूतबाधेपासून सुटकारा करून देण्याचे आमिष दाखवून या महिलांचे वारंवार लैंगिक शोषण केले. भोंदू बाबाने जपळपास अडीच वर्षे या कुटुंबातील महिलांचे लैंगिक शोषण केले. मात्र अखेरच त्याचे बिंग फुटले व पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपुरातील पारडी पोलिसांनी ९ जानेवारी २०२१ रोजी १७ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दुलेवाले बाबाविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.

Share: