IMG-LOGO
राष्ट्रीय

इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध; सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून टीकेला मोदींचं प्रत्युत्तर

Tuesday, Sep 17
IMG

गणेशोत्सव आमच्यासाठी केवळ आस्थेचा विषय नाही”. किंवा नुसता सण नाही.

दिल्ली, दि. १७ :  ते लोक फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा तसाच प्रयत्न चालू आहे. गणेश पूजेवर त्यांचा आक्षेप आहे”. ओडिशामधील विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मोदी यांनी या सगळ्या घटनांवर व विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी मोदी म्हणाले, “गणेशोत्सव आमच्यासाठी केवळ आस्थेचा विषय नाही”.  किंवा नुसता सण नाही. गणेशोत्सवाने आपल्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यावेळी देखील फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करत आपलं शोषण करणारे इंग्रज गणेशोत्सवाला विरोध करत होते. आजही काही सत्तापिपासू लोक आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा गणेशपूजेवर आक्षेप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मोदींनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले व बाप्पाची आरती देखील केली. पंतप्रधानांच्या या कृतीनंतर सरन्यायाधीशांवर व मोदींवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली. ही भेट घटनाबाह्य असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच अनेक घटनातज्ज्ञांनी देखील मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक होती असं म्हटलं होतं. देशाच्या लोकशाहीसाठी हे चांगलं चित्र नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Share: