गंगेच्या काठावर दरवर्षी गंगा दशहरा महोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
नाशिक, दि. १६ : ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगा दशहरा महोत्सव साजरा केला जातो. रविवारी या दशहरा महोत्सवाची सांगता विविध कार्यक्रमांनी उत्साहात करण्यात आली असल्याची माहिती पुरोहित संघ कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी दिलीसिंहस्थ कुंभमेळ्याची भूमी असलेल्या नाशिक शहरात गंगेच्या काठावर दरवर्षी गंगा दशहरा महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. रविवारी ज्येष्ठ शुद्ध दशमीच्या निमित्ताने या दशहरा महोत्सवाची सांगता करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी श्री गंगा गोदावरी मंदिरात व प्राचीन गोदावरी मंदिरात महा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गंगा गोदावरी मंदिरात सायंकाळी 56 भोगाचा नैवेद्य दाखवून त्याचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. यावेळी प्राचीन गोदावरी मंदिरात १५१ महिलांनी गंगा लहरी पठण केले. त्यानंतर हजारो नासिककर भाविकांच्या हस्ते गंगेची वर्षानुवर्षापासूनची असलेले पारंपारिक महाआरती करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गंगा गोदावरीचा परिसर विशेषता रामकुंड परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.