IMG-LOGO
नाशिक शहर

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडिपारीची नोटीस

Thursday, May 09
IMG

सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे.

नाशिक, दि. ९ : लोकसभा निवडणुक असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरुध्द तडिपारीची नोटीस बजावण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे. ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यानं नाशिकचे  राजकारण चांगलेच तापण्याची चिन्ह आहेत. दरम्यान,  बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बडगुजर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री लक्ष घालतील, असे म्हटले होते. दुसऱ्याच दिवशी बडगुजर यांच्याविरोधात तडिपारीची कारवाई झाली आहे. कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी केल्यावर सरकारकडून एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. 

Share: