IMG-LOGO
नाशिक शहर

दीड लाखांची लाच घेताना 'पुरातत्व'च्या आरती आळे जाळ्यात; तेजस गर्गे यांच्यावरही गुन्हा

Thursday, May 09
IMG

ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात आरती आळे यांनी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली.

नाशिक, दि. ९ : तक्रारदाराने कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिकमधील सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी सहायक संचालक पुरातत्व व संग्रहालय यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात आरती आळे यांनी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर संशयित सहायक संचालक आरती मृणाल आळे यांना दीड लाख रूपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. पर्यटन व सांस्कृतिक संचलनालय डायरेक्टर तेजस गर्गे यांना लाचेच्या रकमेमधून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम मंगळवारी स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक एन. बी.सूर्यवंशी, व सुवर्णा हांडोरे यांनी ही कारवाई केली.  

Share: