वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची सूचना पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
नाशिक, दि. २ : शहराची ग्रामदेवता कालिका देवी यात्रोत्सव तर, भगूर येथे रेणुका देवी यात्रोत्सव असल्याने या परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि.३) प्रारंभ होत आहे. वाहतूक मार्गातील हे बदल दसऱ्यापर्यंत (ता.१२) राहतील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची सूचना पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.