IMG-LOGO
महाराष्ट्र विधानसभा २०२४

राष्ट्रवादीकडून ३८ उमेदवारांची यादी जाहीर; अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढणार

Wednesday, Oct 23
IMG

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मुंबई, दि. २३ : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची व मनसेची यादी जाहीर झाल्यावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असे मतदारसंघाचे नाव उमेदवार१ बारामती अजित पवार२ येवला छगन भुजबळ३ आंबेगाव दिलीप वळसे पाटील४ कागल हसन मुश्रीफ५ परळी धनंजय मुंडे६ दिंडोरी नरहरी झिरवळ७ अहेरी धर्मरावबाबा आत्राम८ श्रीवर्धन आदिती तटकरे९ अमळनेर अनिल पाटील१० उदगीर संजय बनसोडे११ अर्जुनी- मोरगाव राजकुमार बडोले१२ माजलगाव प्रकाश सोळंके१३ वाई मकरंद पाटील१४ सिन्नर माणिकराव कोकाटे१५ खेड आळंदी दिलीप मोहिते१६ अहिल्यानगर शहर संग्राम जगताप१७ इंदापूर दत्तात्रय भरणे१८ अहमदपूर बाबासाहेब पाटील१९ शहापूर दौलत दरोडा२० पिंपरी अण्णा बनसोडे२१ कळवण नितीन पवार२२ कोपरगाव आशुतोष काळे२३ अकोले किरण लहामटे२४ वसमत चंद्रकांत नवघरे२५ चिपळूण शेखर निकम२६ मावळ सुनील शेळके२७ जुन्नर अतुले बेनके२८ मोहोळ यशवंत माने२९ हडपसर चेतन तुपे३० देवळाली सरोज अहिरे३१ चंदगड राजेश पाटील३२ इगतपुरी हिरामण खोसकर३३ तुमसर राजू कारेमोरे३४ पुसद इंद्रनील नाईक३५ अमरावती शहर सुलभा खोडके३६ नवापूर भरत गावित३७ पाथरी निर्मला विटेकर३८ मुंब्रा कळवा नजीब मुल्ला

Share: