IMG-LOGO
महाराष्ट्र

नीटच्या पेपरफुटी प्रकरणात लातूरमधून दोन शिक्षकांना अटक

Sunday, Jun 23
IMG

दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नांदेड एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

लातूर, दि. २३ :  वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली. NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उथळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही. नवं शिक्षण धोरण यांनी आणलं मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुलांना इतक्या परीक्षा द्याव्या लागत आहेत असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. बिहारमधून परीक्षेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत पेपरफुटी प्रकरण घडले, असल्याचा आरोप ठेवण्यात आला. पण बिहार हे एकमात्र राज्य नाही जिथे गैरकारभार झाला. आता पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.नांदेडच्या दहशतवादी विरोधी पथकाने नीटच्या पेपरफुटी प्रकरणात लातूरमधून दोन शिक्षकांना अटक केली आहे. बिहारमधून १३ लोकांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातूनही दोन लोकांना ताब्यात घेतल्यामुळे पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्राचे कनेक्शन आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नांदेड एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी एक शिक्षक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूरमध्ये कार्यरत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आता दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या बँक व्यवहारात गडबड असल्याचे समोर येत आहे. 

Share: