दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांशी हुज्जत घालत असून त्यात भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचीही नावं घेतली जात आहेत.
नगर , दि. १३ : शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनीही हे व्हिडीओ शेअर करत सविस्तर पोस्ट लिहिली आहे. शरद पवार गटानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही कार्यकर्ते भांडत असल्याचं दिसत आहे. हे रात्रीचे व्हिडीओ असून त्यात रस्त्यावर रोख रकमेची बंडलं पडल्याचंही दिसत आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांशी हुज्जत घालत असून त्यात भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचीही नावं घेतली जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शरद पवार गटानं या व्हिडीओंच्या चौकशीची मागणी केली आहे.नीलेश लंके यांच्या ट्वीटमध्ये काय ; हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा?पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले.. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा?