IMG-LOGO
महाराष्ट्र

धुळ्यात पिकअप-कारचा अपघात, ५ जण ठार; ४ गंभीर

Sunday, Sep 15
IMG

शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाटा येथे हा अपघात घडला आहे. जखमींवर धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धुळे, दि. १५:  धुळ्यात पिकअप व्हॅन आणि ईको कार यांच्यात रविवारी भीषण अपघात घडला. या अपघातात पाच जणांच मृत्यू झाला आहे. तर, चार जण गंभीर जखमी झाले हेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाटा येथे हा अपघात घडला आहे. जखमींवर धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप व्हॅनने या इको कार ला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.  दरम्यान, पिकअप वाहनाचा चालक मद्यधुंत अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

Share: