IMG-LOGO
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदी वायनाडमध्ये दाखल; भूस्खलन प्रभावित क्षेत्रांची हेलिकॉप्टरद्वारे केली पाहणी

Saturday, Aug 10
IMG

भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर आपत्तीपैकी एक असलेल्या मोरबी दुर्घटनेचा अनुभव सांगितला.

वायनाड, दि. १० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागांना भेट देऊन सहानुभूती व्यक्त केली आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी गुजरातमधील १९७९ च्या मोरबी धरण दुर्घटनेच्या दु:खद आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान वायनाडच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर होते, जिथे त्यांनी ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची हवाई आणि प्रत्यक्ष पाहणी केली, ज्यात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच जण बेपत्ता आहेत. या पाहणी दौऱ्यानंतर आढावा बैठकीत बोलताना मोदींनी भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर आपत्तीपैकी एक असलेल्या मोरबी दुर्घटनेचा अनुभव सांगितला.दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी वायनाडमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींनी या घटनेला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं, अशी मागणीही त्यांनी केली. वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३० जुलै रोजी भीषण भूस्खलनाची घटना घडली होती. या दुर्घटनेत ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर आता पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्ये पोहोचत भूस्खनल प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे. ४५-४७ वर्षांपूर्वी गुजरातमधील मोरबी येथे धरण होते. मुसळधार पाऊस झाला आणि धरण पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने मोरबी शहरात पाणी साचले. संपूर्ण शहरात १० ते १२ फूट पाणी होते आणि २५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, असे मोदी म्हणाले. "मी स्वयंसेवक म्हणून जवळपास सहा महिने तिथे राहिलो... मी ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि मी तुम्हाला खात्री देतो की देश आणि भारत सरकार कोणतीही कसर सोडणार नाही.

Share: