IMG-LOGO
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi Protest : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी

Saturday, Aug 24
IMG

संगमनेरमध्ये आमदार थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी पट्टी लावत, काळे झेंडे घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.

संगमनेर, दि. २४ :  आपण चाळीस वर्षे राज्याच्या राजकारणात आहोत. मात्र इतके वाईट राजकारण कधीही पाहिले नाही. जनतेमध्ये या सरकारविरुद्ध मोठा रोष आहे. बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत या सरकारने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आमदार थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी पट्टी लावत, काळे झेंडे घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, ॲड. माधवराव कानवडे, शिवसेनेचे अमर कतारी, आप्पा केसेकर, इसाकखान पठाण यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Share: