राजकोट किल्ल्यावर टिकाऊ मोठे स्मारक उभारले पाहिजे. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मालवण, दि. १ : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मालवण राजकोट किल्ल्यावर भेट दिली. मला या विषयावरून कोणतेही राजकारण करायचे नाही. शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरुन विरोधक व सत्ताधारी यांनी राजकारण करू नये. पुतळा कोसळल्याचे त्यांना दुःखच झाले नाही, दुःख असते तर राडा झाला नसता. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा जनताच कार्यक्रम करणार आहे, पुतळा दुर्घटनेतील दोषी पळून कसे जाऊ शकतात. राजकोट किल्ल्यावर टिकाऊ मोठे स्मारक उभारले पाहिजे. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा बांधवांसह मालवणमधील राजकोट किल्ल्यावर भेट देऊन शिवपुतळा दुर्घटनेची पाहणी केली. “मी शिवरायांचा मावळा असून मी राजकोट येथे शिवपुतळा दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आलो आहे, पुतळा दुर्घटनेतील दोषी पळून कसे जाऊ शकतात, त्यांना शोधून योग्य तो तपास झाला पाहिजे, दोषी व्यक्ती कोणत्याही मंत्र्यांचा मित्र असू दे, तो पंतप्रधानांचा जरी मित्र असला तरी त्याला पकडून जेलमध्ये सडवला पाहिजे.”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.