IMG-LOGO
लोकसभा २०२४

भारतीय नागरिकांना भाजपनं चक्रव्युहमध्ये अडकवलं; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

Monday, Jul 29
IMG

या सरकारच्या कार्यकाळात संपूर्ण देशात भीतीचं वातावरण आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते देखील घाबरलेले आहे.

नवी दिल्ली, दि. २९  : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी भारतीय नागरिकांना भाजपनं चक्रव्युहमध्ये अडकवलं आहे, असा त्यांनी आरोप केला. महाभारतामध्ये अभिमन्यूबरोबर जे झालं होतं, तेच आज भारतीयांसोबत केलं जात आहे, असा त्यांनी दावा केला. लोकसभेत बजेटवरील चर्चेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी भाजपाला इंटर्नशिप के पेपर लीक प्रकरणात घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपा खासदारांनी अनेक वेळा राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर लोकसभेत दोन्ही बाजूंनी जोरदार गदारोळ झाला.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बजेटवरील चर्चेत भाग घेताना सांगितलं की, 'या सरकारच्या कार्यकाळात संपूर्ण देशात भीतीचं वातावरण आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते देखील घाबरलेले आहे. या बजेटचा हेतू फक्त एकाधिकार असलेले उद्योगपती, एकाधिकार असलेले राजकारणी आणि एजन्सींना भक्कम करण्याचा आहे. देशभरात 'कर दहशतवाद' आहे.  

Share: