IMG-LOGO
राष्ट्रीय

हिंडनबर्गच्या रिपोर्टवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

Sunday, Aug 11
IMG

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय शेअर बाजाराच्या अखंडतेबाबत कडक इशारा दिला आहे.

दिल्ली, दि. ११ : हिंडेनबर्ग रिसर्चच्या नव्या अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधवी बूच वरून लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावरील आरोपांनंतर गुंतवणूकदारांनी कष्टाने कमावलेले पैसे गमावल्यास कोणाला जबाबदार धरणार असा सवाल राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत केला आहे. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या शॉर्टसेलर कंपनीने केलेल्या ताज्या आरोपांनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय शेअर बाजाराच्या अखंडतेबाबत कडक इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनी एका व्हिडिओ निवेदनाद्वारे भारताचे बाजार नियामक सेबीचे प्रमुख असलेल्या संभाव्य हितसंबंधांच्या संघर्षाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. संयुक्त संसदीय समितीच्या तपासाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या X वर पोस्ट करत म्हटले आहे की, "पंतप्रधान मोदी संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) तपासाला घाबरतात आणि ते का समोर येत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. 

Share: