राज ठाकरे हे पहिल्यांदाच मोदीं बरोबर एका मंचावर दिसतील. या आधीच्या शिवाजी पार्कवरच्या सभा राज ठाकरे यांनी एक हाती गाजवल्या आहेत.
मुंबई, दि. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत येत आहे. त्यांची शिवाजी पार्कवर सभा होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे त्याच मंचावर राज ठाकरेही असणार आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचीही सभा होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल संबोधित करतील.राज ठाकरे हे पहिल्यांदाच मोदीं बरोबर एका मंचावर दिसतील. या आधीच्या शिवाजी पार्कवरच्या सभा राज ठाकरे यांनी एक हाती गाजवल्या आहेत. त्यामुळे मोदीं समोर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवलेही उपस्थित राहाणार आहेत.