IMG-LOGO
राष्ट्रीय

शाळेच्या बसला भीषण अपघात; अपघातात ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू , तर १५ विद्यार्थी जखमी

Thursday, Apr 11
IMG

ही बस सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. यावेळी ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस उलटली.

महेंद्रगड, ‍‍‍‌ दि. ११ : हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावाजवळ शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू , तर १५ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बस महेंद्रगडमधील जीआरएल शाळेची आहे. ही बस सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. यावेळी ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस उलटली. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे.  

Share: