मोहन भागवत यांच्यासोबत संघाचे ज्येष्ठ प्रचारक भय्याजी जोशी यांनीही मतदान केले.
नागपूर, दि. २० : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील संघ मुख्यालय जवळ असलेल्या भाऊजी दप्तरी शाळेत जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले आहे. ‘लोकशाहीला मजबूत करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे,’. मी उत्तरांचल येथे होतो. मतदानासाठी नागपूरला आलो आहे आणि मतदानाचा हक्क मी बजावला आहे. प्रत्येकाने मतदान करावे अशी प्रतिक्रिया मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. सकाळी ७ वाजता सर्वात प्रथम जाऊन त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यावेळी यावेळी मोहन भागवत यांच्यासोबत संघाचे ज्येष्ठ प्रचारक भय्याजी जोशी यांनीही मतदान केले.