एप्रिल महिन्यात त्याच्या घराबाहेर गोळीबारही झाला होता. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दीकींची हत्या झाली.
मुंबई, दि. १८ : अभिनेता सलमान खानला ठार करण्यासाठी बिश्नोई गँगने २५ लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत आली. सलमान खान त्यांच्या टार्गेटवर आहे हे आधीही समोर आलं होतं. आता सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने २५ लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात त्याच्या घराबाहेर गोळीबारही झाला होता. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दीकींची हत्या झाली. त्यानंतर आता सलमान बाबत ही माहिती समोर आली आहे.बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आणखी एक धमकी मिळाली आहे. यावेळी ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. ट्रॅफिक कंट्रोल रुमला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचं असल्याचं सांगितलं आहे. सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला असून, लॉरेन्स बिश्नोईशी () असलेले दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, तो सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामंजस्य घडवून आणणार आहे, त्यासाठी त्याने पैसे मागितले आहेत आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे.