IMG-LOGO
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सलमान खानची भेट

Tuesday, Apr 16
IMG

आरोपींना अटक केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी सलमानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली.

मुंबई, दि. १६ : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर काही दिवसांपूर्वी दोन आरोपींनी मोटारसायकल वरुन येत गोळीबार केला होता. गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. आरोपींना अटक केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी सलमानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी सलमानसह त्याचे वडील सलीम खानही घरी हजर होते. शिवसेना नेते राहुल कनाल, वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी हे देखील यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंनी सुरक्षा-व्यवस्थेबद्दल सलमान खानच्या कुटुंबियांशी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, गोळीबार घडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही रात्री सलमान खानच्या घरी भेटीस गेले होते. 

Share: