या प्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात केली आहे.
मुंबई, दि. २ : शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले होते. या प्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात केली आहे. हेलिकॉप्टरने नेमकं कुणी आणलं? त्यात कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी AB फॉर्म मागवण्यात आले? त्याला किती खर्च आला? यासह अन्य बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रकरण शिंदेसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या एबी फॉर्म प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नाशिकच्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने हे एबी फॉर्म पाठवणे शिंदे सेनेच्या अंगलट आले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.