शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला.
मुंबई, दि. २० : दिवंगत नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत चर्चा केली होती. आता विधानसभेवेळी त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला, विधानसभेमध्ये त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.“राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करत असताना विधानसभा निवडणुकीचेच कारण आहे. आमची शिवसंग्राम संघटना समाजकारण करते. त्यामुळे समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन पुढे जाण्यासाठी हा पक्ष प्रवेश केला आहे. बीड विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही आमचा प्रस्ताव मांडलेला आहे. आमची यासंदर्भात चर्चा झालेली आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही पक्षाने सांगितलेली सर्व जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर दिली.