IMG-LOGO
महाराष्ट्र विधानसभा २०२४

Maharashtra Vidhansabha Election 2024 : शिवसेना एकनाथ शिंदे गटाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दादा भुसे, कांदे यांचा समावेश

Tuesday, Oct 22
IMG

शिवसेनेच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या उमेदवारीचीही घोषणा केली आहे.

मुंबई, दि. २२  :  शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण ४५ जणांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या उमेदवारीचीही घोषणा केली आहे. तसेच दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह काही विद्यमान आमदारांनाही संधी दिली आहे. भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी यादी जाहीर केली आहे.शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. माहिममधून आमदार सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे. राजापूर मतदारसंघात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना संधी देण्यात आली आहे. पैठणमध्ये विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे याला संधी दिली आहे. तर खानापूरमध्ये दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांना उतरवण्यात आले आहे.४५ उमेदवारांची यादी अशी कोपरी पाचपाखाडी-एकनाथ शिंदे साक्री - मंजुळाताई गावितचोपडा - चंद्रकांत सोनावणेजळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटीलएरंडोल - अमोल चिमणराव पाटीलपाचोरा - किशोर पाटीलमुक्ताईनगर - चंद्रकांत पाटीलबुलढाणा - संजय गायकवाडमेहकर - संजय रायमुलकरदर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळरामटेक - आशिष जैस्वालभंडारा - नरेंद्र भोंडेकरदिग्रस - संजय राठोडनांदेड उत्तर - बालाजी कल्याणकरकळमनुरी - संतोष बांगरजालना - अर्जून खोतकरसिल्लोड - अब्दुल सत्तारछत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वालछत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाटपैठण - विलास भुमरेवैजापूर - रमेश बोरनारेनांदगाव - सुहास कांदेमालेगाव बाह्य - दादाजी भुसेओवळा माजिवडा - प्रताप सरनाईकमागाठाणे - प्रकाश सुर्वेजोगेश्वरी पूर्व - मनीषा रवींद्र वायकरचांदिवली - दिलीप भाऊसाहेब लांडेकुर्ला - मंगेश कुडाळकरमाहिम - सदा सरवणकरभायखळा - यामिनी जाधवकर्जत - महेंद्र थोरवेअलिबाग - महेंद्र हरी दळवीमहाड - भरतशेठ गोगावलेउमरगा - ज्ञानराज चौगुलेपरांडा - तानाजी सावंतसांगोला- शहाजी बापू पाटीलकोरेगाव - महेश शिंदेपाटण - शंभूराज देसाईदापोली - योगेश कदमरत्नागिरी - उदय सामंतराजापूर - किरण सामंतसावंतवाडी - दीपक केसरकरराधानगरी - प्रकाश आबिटकरकरवीर - चंद्रदीप नरकेखानापूर - सुहास बाबर

Share: