लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे'' असं राऊत यावेळी म्हणाले.
मुंबई, दि. १८ : आज सकाळी माझी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकूल वासनिक यांच्याशी बोलणे झाले. ते आज राहुल गांधींशी बोलणार आहेत. जागा वाटपाबद्दल थांबलेल्या गोष्टींना गती मिळावी यासाठी चर्चा करणार आहे'' असं संजय राऊत म्हणाले. ''बऱ्याच जागांवर निर्णय झालाय. काही जागांवर निर्णय होत नाहीय. आता वेळ कमी आहे. महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत असं मला वाटतं. ते वारंवार दिल्लीत यादी पाठवतात. मग, चर्चा होते. आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे'' असं राऊत यावेळी म्हणाले.महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सगळ्यांना पक्ष चालवायचे आहेत आणि टिकवायचे आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन जास्त खेचाखेची बरी नाही हे आम्हालाही माहीत आहे. निर्णय लवकर झाले पाहिजेत कारण भाजपाचा आम्हाला पराभव करायचा आहे. भाजपाशी कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात भाजपा, अमित शाह आणि मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास शिवसेनेला दिला आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्या भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. आम्ही सगळा त्रास सहन करुन आम्ही उभे आहोत. असंही राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.