IMG-LOGO
क्रीडा

Paris Olympic 2024 : नेमबाजीत मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास

Monday, Jul 29
IMG

बारा वर्षानंतर कांस्यपदक मिळाल्यानंतर नेमबाजीमध्ये भारत आशावादी झाला आहे.

नवी दिल्ली, दि. २९  : 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. गेल्या 12 वर्षांत भारताने नेमबाजीमध्ये कोणतंही पदक मिळवलं नव्हतं. 2012 मधली ऑलिम्पिक स्पर्धा लंडन येथे झाली होती. त्यावेळी विजय कुमार आणि गगन नारंग यांनी नेमबाजीमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं होतं. नेमबाजीमध्ये कांस्यपदक मिळवणारी मनू पहिली भारतीय महिला ठरली. 221.7 गुणांनी मनूने कांस्यपदक जिंकलं. कोरियाच्या जिन ये ओहने 243.2 विक्रमासह सुवर्णपदकाची मानकरी ठरली तर  आणि किम येजीने 241.3 गुणांसह रौप्यपदक जिंकलं. तब्बल बारा वर्षानंतर कांस्यपदक मिळाल्यानंतर नेमबाजीमध्ये भारत आशावादी झाला आहे.

Share: