IMG-LOGO
राष्ट्रीय

मतदानाच्या आकडेवारीवर संशय? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

Sunday, May 19
IMG

24 मे रोजी उन्हाळी सुट्टीत योग्य खंडपीठासमोर सुनावणीसाठी याचिका सूचीबद्ध केली.

दिल्ली, दि. १९ : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करताना निवडणूक आयोगाकडून एका आठवड्यात उत्तर मागितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतरचा डेटा निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ४८ तासाच्या आत अपलोड करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आदल्या दिवशी वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाला याचिकेवर आजच सुनावणी करण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांना निरोप देण्यासाठी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेला कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ सुनावणीसाठी बसले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी या याचिकेवर उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विनंतीला योग्य ठरवले. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाला थोडा वेळ द्यावा, असे खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या एक दिवस अगोदर 24 मे रोजी उन्हाळी सुट्टीत योग्य खंडपीठासमोर सुनावणीसाठी याचिका सूचीबद्ध केली. या संक्षिप्त सुनावणीदरम्यान, निवडणूक आयोगातर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग म्हणाले की, एनजीओ असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी याचिकेत पूर्णपणे खोटे आरोप केले आहेत. याशिवाय न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका खंडपीठाने काही मुद्द्यांवर तोडगा काढला आहे. हा मुद्दाही सध्याच्या खटल्याचा भाग आहे.

Share: