IMG-LOGO
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi Protest : भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, कार्यकर्त्यांना दिली शपथ

Saturday, Aug 24
IMG

आंदोलना दरम्यान शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले.

पुणे, दि. २४ : बदलापूर प्रकरणाविरोधात महाविकास आघाडीने राज्यभरात मुक आंदोलन केले. यावेळी पुण्यात शरद पवारही या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांच्या बरोबर सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही होते. आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. त्यावेळी शरद पवारांनी भिजत आंदोलन सुरूच ठेवले. त्यांच्या बरोबर खासदार सुप्रिया सुळे, आमदार रविंद्र धंगेकर हे ही भित आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शरद पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना महिलांचा सन्मान आणि संरक्षण करण्याची शपथ दिली.  आंदोलना दरम्यान शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. एक अस्वस्थ करणारा हा प्रसंग आहे. बदलापूरला जो चिमुकल्या मुलींवर  अत्याचार झाला, त्याने सबंध देशात राज्याची नाचक्की झाली.राज्याच्या नावलौकीकाला धक्का बसला असे शरद पवार यावेळी म्हणाले. ज्या सरकारची या गोष्टी रोखणे ही जाबाबदारी आहे त्यांना त्याची जाण राहीली नाही. या घटनेनंतरही कुठेना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा घटनां विरोधात आवाज उठवला तर त्याला राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी राजकारण आहे असं म्हणलात. त्यांचे हे वक्तव्य त्यांची मानसिकता दर्शवते. शिवाय हे वक्तव्य म्हणजे चमत्कारीक असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. या वेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना महिलांच्या रक्षणाची आणि सन्मानाची शपथ दिली. 

Share: