आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दिल्ली, दि. ९ : नरेंद्र मोदी आज (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी राजधानी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आल आहे. मात्र, सोहळ्याचं काँग्रेसला निमंत्रण मिळालं नाही. शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.