IMG-LOGO
क्रीडा

T-20 World Cup 2024 SA Vs AFG : अफगाणची हाराकारी; सेमी-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ९ विकेट्सने सामना जिंकला

Thursday, Jun 27
IMG

दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने २९ धावा केल्या. तर कर्णधार एडन मारक्रमने २३ धावा केल्या.

सॅन फर्नांडो, त्रिनिदाद आणि टोबॅगो, दि. २७ : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवत फायनलमध्ये अगदी थाटात प्रवेश केला आहे. ब्रायन लारा क्रिकेट अकदामी येथील मैदानावर झालेला सामना दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्स राखून जिंकला. अफगाणिस्तानच्या फलंदाजीची अभूतपूर्व पडझड झाल्यानंतर 57 धावांचं टार्गेट आफ्रिकन संघाने अवघ्या ८.५ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला.अफगाणिस्तानने सर्वांनाच चकित करत सेमीफायनलमध्ये धडक मारली तर दक्षिण आफ्रिकेचा संघाने यंदाही एकही सामना न गमावता सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने २९ धावा केल्या. तर कर्णधार एडन मारक्रमने २३ धावा केल्या. हे दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत नाबाद राहिले.  संघाची सुरुवात तशी खराब झाली पण धावसंख्या कमी असल्याने दक्षिण आफ्रिकेचा निभाव लागला. क्विंटन डी कॉक अवघ्या ५ धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्याला फजलहक फारुकीने बाद केले.या सामन्यात अफगाणिस्तानचे फलंदाज कमालीचे फ्लॉप ठरले. फक्त अजमतुल्ला उमरझाईला दुहेरी आकडा गाठता आला. या सामन्यात त्याने १० धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज, नूर अहमद आणि मोहम्मद नबी यांना खातेही उघडता आले नाही.  मार्को यान्सने ३ षटकांत १६ धावा देत ३ विकेट घेतले. तबरेज शम्सीनेही तीन विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खियाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. 

Share: