IMG-LOGO
क्रीडा

TATA IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोलकात नाईट रायडर्स Vs सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना

Monday, May 20
IMG

राजस्थान रॉयलचे नुकसान झाले असून पहिल्या दोन संघातून राजस्थान बाहेर पडला आहे.

मुंबई, दि. २० :  आयपीएल २०२४ चा ७० वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता, परंतु मुसळधार पावसामुळे तो रद्द करण्यात आला आहे. ज्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ गुण देण्यात आले. त्यामुळे राजस्थान रॉयलचे नुकसान झाले असून पहिल्या दोन संघातून राजस्थान बाहेर पडला आहे. आयपीएल २०२४ मधील प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत, ज्यामध्ये अनुक्रमे कोलकात नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघांचा समावेश आहे. क्वालिफायर-१ हा केकेआर संघाचा सामना हैदराबाद संघाशी होणार आहे. हा सामना २१ मे या दिवशी अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. पहिला क्वालिफायर जिंकेल तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. त्या पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल. राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी या संघात क्वालिफायर-२ होणार आहे. हा सामना २२ मे या दिवशी अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. आयपीएलचा अंतिम फेरीचा सामना हा रविवारी २६ मे या दिवशी चेन्नई येथे होणार आहे. या सामन्यातून आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे.

Share: