पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावली.
दिल्ली, दि. १० : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले आहे. वक्फ बोर्ड ठरावादरम्यान वाद झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. परंतु, त्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी संसदेत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एकाच फ्रेममध्ये दाखवणारे दुर्मिळ दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.२२ ऑगस्ट सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ ऑगस्ट रोजी संपणार होते. परंतु, ते आज ९ ऑगस्ट रोजीच तहकूब करण्यात आले. ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. तसंच, राज्यसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले.