IMG-LOGO
लोकसभा २०२४

उद्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघालाही नकली म्हणतील; उद्धव ठाकरे यांची नड्डा यांच्या विधानावरून टीका

Sunday, May 19
IMG

ज्या शिडीचा आधार घेऊन मोठे झालेत त्याच शिडीला आज सोडण्याची तयारी भाजपनं केल्याची टीका वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलीय.

मुंबई, दि. १९ : अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजपाला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता. सुरुवातीला आमची ताकद कमी होती. मात्र, आता पक्षाची ताकद वाढली आहे. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. भाजप आता संपूर्ण पक्ष स्वतः चालवतो.  पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत असं नड्डा यांनी म्हटलं आहे. यावर उद्धव ठाकरेंना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी “आता मला आरएसएससाठी भीती वाटायला लागली आहे. भाजपा आता संघावरही बंदी आणेल”, असं विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या इतर शीर्ष नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.जे. पी. नड्डा यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचाही तर्क लावला जात आहे. शिवसेनेला नकली म्हणणारे उद्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघालाही नकली म्हणतील हे मी व्यक्त केलेले भाकित भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुलाखतीवरून स्पष्टच झालं आहे. कारण नड्डा यांनीही संघाची उपयुक्तता संपल्याचे विधानावरून स्पष्ट होत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  तर ज्या शिडीचा आधार घेऊन मोठे झालेत त्याच शिडीला आज सोडण्याची तयारी भाजपनं केल्याची टीका वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलीय.

Share: