IMG-LOGO
नाशिक शहर

नाशिकमार्गे धावणाऱ्या २० मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द

Friday, May 31
IMG

मुंबई-मनमाड-पंचवटी एक्स्प्रेस एक जून रोजी रद्द करण्यात आली आहे.

नाशिक, दि. ३१ : मध्य रेल्वेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात रेल्वे फलाट दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी एक आणि दोन जून रोजी ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाडमार्गे धावणाऱ्या जवळपास २० मेल, एक्स्प्रेस महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगा ब्लॉक अंतर्गत गाडी क्रमांक १७६१८ अप नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस ३१ मे आणि एक जून, साईनगर-शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ३१ मे आणि एक जून, डाउन मुंबई-नांदेड तपोवन एक व दोन जून, डाउन मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक व दोन जून, मुंबई-मनमाड-धुळे एक व दोन जून, डाऊन मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक व दोन जून, मुंबई-मनमाड-पंचवटी एक्स्प्रेस एक जून रोजी रद्द करण्यात आली आहे.

Share: