IMG-LOGO
महाराष्ट्र

गुंड प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात ताठ मानेने वावरताय : विजय वडेट्टीवार

Tuesday, Aug 20
IMG

गृहमंत्री नेमकं काय करत आहेत, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडला आहे.

बदलापूर, दि. २० : बदलापूरमधील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली.  विशिष्ट समुहाची संस्था असल्याने आरोपीला वाचलं जातं आहे. या प्रकणात कारवाई करण्यास कमालीची दिरंगाई करण्यात आली. अशा नराधमाला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न कसा असू शकतो? बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्यात कायदा सुवस्था बिघडली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. अशा परिस्थितीती राज्याचं गृहखातं आणि गृहमंत्री नेमकं काय करत आहेत, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडला आहे. कायद्याचा धाक नसल्याने गुंड प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात ताठ मानेने वावरत आहेत. अशा लोकांना सरकारमधील काही मंत्री मदत करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. पुढे बोलताना सरकारी तिजोरीतून महिलांना पैसे देऊन स्वत:ची पाठ थोपटणारे महिला अत्याचारावर का बोलत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Share: